सभापती वैकुंठदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे नागोठण्यात विविध सामाजिक उपक्रम

सभापती वैकुंठदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे नागोठण्यात विविध सामाजिक उपक्रम

नागोठणे रायगड ( शामकांत नेरपगार ) – : रायगड जिल्हा परिषदेचे सभापती वैकुंठदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी नागोठणे शहराच्या वतीने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

या उपक्रमांची सुरुवात नागोठणे येथील श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वृक्षलागवड केली. त्यानंतर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रुग्णांची विचारपूस करण्यात आली तसेच रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून रुग्णांप्रती आपुलकी आणि सामाजिक सेवेचा संदेश देण्यात आला.

समाजातील विविध घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता. अशा विधायक उपक्रमांमुळे वाढदिवस साजरा करण्याला एक वेगळे सामाजिक महत्त्व प्राप्त झाले.

या कार्यक्रमाला भाजप महाराष्ट्र राज्य महिला आघाडी चिटणीस श्रेया कुंटे, भाजप व्यापारी सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष सचिन मोदी, रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे, गौतम जैन, विवेक रावकर, तिरत पोलसानी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!