नागोठण्यात ‘आंगन मिलन सेवा’; आमदार चित्राताई वाघ यांची शुक्रवारी उपस्थिती अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशासेविकांचा सत्कार; विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

नागोठण्यात ‘आंगन मिलन सेवा’; आमदार चित्राताई वाघ यांची शुक्रवारी उपस्थिती

अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशासेविकांचा सत्कार; विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘आंगन मिलन सेवा’ हा उपक्रम २५ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये अंगणवाडी कार्यकर्त्या, सहायिका व आशा कार्यकर्त्यांचा सन्मान तसेच पोषण, आरोग्य आणि मातृसंवादावर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

                याच पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्राताई वाघ शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी नागोठणे येथे ‘आंगन मिलन सेवा’ अभियानांतर्गत अंगारआळी व उर्दू हायस्कूल आदी दोन अंगणवाडी केंद्रांना भेट देणार आहेत. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशासेविकांचा सत्कार करण्यात येणार असून, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येणार आहे.

               या कार्यक्रमाला आमदार चित्राताई वाघ यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील, ज्येष्ठ नेते सतिश धारप, रायगड जिल्हा परिषद सभापती वैकुंठशेठ पाटील, महिला नेत्या निलिमाताई पाटील, भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रेयाताई कुंटे, महिला मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष चित्राताई पाटील, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा शर्मिलाताई पाटील, गीताताई पालरेचा, जिल्हा सरचिटणीस हेमाताई मानकर, जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, महेश मोहिते, प्रशांत शिंदे, आलाप मेहता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपचे पुरुष व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेश सचिव श्रेयाताई कुंटे यांनी दिली आहे .

                  आमदार चित्राताई वाघ यांच्या नागोठणे आगमनानंतर सकाळी ९.३० वाजता त्या प्रदेश सचिव श्रेयाताई कुंटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर ‘आंगन मिलन सेवा’ अभियानातील विविध कार्यक्रमांना त्या उपस्थित राहणार आहेत.

                 अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण, आरोग्य, बालविकास आणि समुदाय सहभागाला चालना देण्याच्या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान आमदार चित्राताई वाघ यांच्या नागोठणे दौऱ्यामुळे भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!