कोंडगावच्या शिवराज मित्र मंडळाच्या साखरचौथ गणेशोत्सवाला पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट

कोंडगावच्या शिवराज मित्र मंडळाच्या साखरचौथ गणेशोत्सवाला पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट

गणरायाचे दर्शन घेत पालकमंत्र्यांनी घेतला उत्सवाच्या तयारीचा आढावा; शिवसेना युवा नेते हरीश धामणे यांच्या हस्ते सत्कार

नागोठणे, रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे जवळील कोंडगाव येथे शिवराज मित्र मंडळाच्या साखरचौथ गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. “१५ वर्षे अभिमानाची, उत्सवाची, परंपरा व संस्कृती जपणुकीची” ही परंपरा कायम ठेवत मंडळाच्या वतीने मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली.

साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी कोंडगाव येथे भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या उत्सवाच्या तयारीची व व्यवस्थेची माहिती घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

याप्रसंगी शिवराज मित्र मंडळ कोंडगाव व शिवकन्या ग्रुपच्या वतीने शिवसेना युवा नेते हरीश धामणे यांच्या हस्ते पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते कृष्णाजी धामणे, शिवसेना नागोठणे विभागप्रमुख प्रविण ताडकर, नेते विजय धामणे, युवा नेते हरीश धामणे, विनोद धामणे, कोंडगाव शाखाप्रमुख रामचंद्र धामणे, उपशाखाप्रमुख नितेश धाडसे यांच्यासह शिवराज युवक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१५ वर्षांची परंपरा कायम

साखरचौथीच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील विविध भागांत गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. कोंडगाव येथील शिवराज मित्र मंडळाने गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेली गणेशोत्सवाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. आकर्षक सजावट, धार्मिक वातावरण आणि विविध उपक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी नागोठणे विभागातील विविध ठिकाणी साखरचौथ गणपती बाप्पाला वाजत-गाजत, भक्तिभावाने निरोप देत विसर्जन करण्यात आले.

॥ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!