रोहा कार केअरच्या अत्याधुनिक वॉशिंग-डिटेलिंग सेंटरचा १५ ऑगस्टला शुभारंभ: सुशिक्षित बेरोजगार तरुण रविंद्र झोरे यांचे अनोख्या व्यवसायात पदार्पण

रोहा कार केअरच्या अत्याधुनिक वॉशिंग-डिटेलिंग सेंटरचा १५ ऑगस्टला शुभारंभ: सुशिक्षित बेरोजगार तरुण रविंद्र झोरे यांचे अनोख्या व्यवसायात पदार्पण

वाकणनाका (सुनिल कोकळे) : रोहा तालुक्यातील तसेच आसपासच्या परिसरातील  वाहनप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून, ‘रोहा कार केअर’ वॉशिंग/डिटेलिंग सेंटरच्या नवीन अत्याधुनिक सेंटरचा शुभारंभ शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

येथीलच म्हाडा कॉलनी, रोहा येथे हे नवीन सेंटर सुरू होत असून, चारचाकी तसेच दुचाकी वाहनांसाठी विविध आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या सेंटरमध्ये संपूर्ण बॉडी वॉश, इंटेरियर क्लिनिंग, वॅक्स पॉलिश, सीट शॅम्पू क्लिनिंग, इंजिन क्लिनिंग आणि फोम वॉश अशा विविध सेवा देण्यात येणार आहेत. कार व एसयूव्ही सोबतच बाइक व स्कूटरसाठीही व्यावसायिक पद्धतीने वॉशिंगची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

आपल्या ग्राहकांना प्रीमियम क्वालिटी प्रॉडक्ट्स, वेळेवर सेवा, अनुभवी व प्रशिक्षित स्टाफ, पर्यावरणपूरक पद्धती आणि योग्य दरात उत्तम सेवा देण्याचा मानस ‘रोहा कार केअर’चे ओनर रविंद्र झोरे यांनी व्यक्त केला आहे.

या शुभारंभ सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच वाहनप्रेमींनीही उपस्थित राहून आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन रोहा कार केअर चे मालक रविंद्र झोरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!