नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचा १४ वा वर्धापन दिन २० मार्चला : खा. सुनील तटकरे, महेंद्रशेठ घरत व मधुकरशेठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती;ज्येष्ठ, उत्कृष्ट व युवा पत्रकार पुरस्कारांचे वितरण
नागोठणे (शामकांत नेरपगार) :
गेल्या तेरा वर्षांपासून सातत्याने आपला वर्धापन दिन नित्यनियमाने साजरा करून रायगड जिल्ह्यासह नागोठणे शहर व ग्रामीण विभागात नावलौकिक मिळविलेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा चौदावा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि. २० मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत तसेच रजिपचे उपाध्यक्ष मधुकरशेठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती पत्रकार असोसिएशनचे सचिव अनिल पवार यांनी दिली.
कार्यक्रमासाठी पत्रकार असोसिएशनकडून जय्यत तयारी करण्यात आली असून दापोली (जि. रत्नागिरी) येथील पत्रकार यशवंत कांबळे यांना कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, पनवेल येथील पत्रकार प्रशांत शेडगे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर माणगाव येथील पत्रकार परेश शिंदे यांना युवा पत्रकार पुरस्कार खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
तसेच नागोठणे शहर व ग्रामीण विभागासह रायगड जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला रजिप सदस्य सुमितदादा काते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, नरेंद्रशेठ जैन, रायगड जिल्हा दिशा समिती सदस्य शिवरामभाऊ शिंदे, नागोठणे सहकारी भातगिरणीचे सभापती सदानंद गायकर, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, सुधागड पंचायत समितीचे उपसभापती संदेश शेवाळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सोपानभाऊ जांबेकर, नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक, शिवसेना उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे विभाग अध्यक्ष संतोष कोळी, माजी सरपंच विलास चौलकर, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सद्दाम दफेदार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे मार्गदर्शक दिलीपभाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष ॲड. महेश पवार, सचिव अनिल पवार, खजिनदार किशोर कदम, सहसचिव राजेंद्र जोशी तसेच सदस्य विनोद भोईर, सुनिल कोकळे, दिनेश ठमके, चेतन टके, सचिन नेरपगार, राजेश पिंपळे, मंजुळा म्हात्रे, वर्षा सहस्त्रबुद्धे आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.


Aabasaheb great work , and social service regarding public,social work heartly congratulation for your future work
Congrats sunil kokale sirji