रोहा कार केअरच्या अत्याधुनिक वॉशिंग सेंटरचा १० ऑगस्टला शुभारंभ: सुशिक्षित बेरोजगार तरुण रविंद्र झोरे याचे अनोख्या व्यवसायात पदार्पण

 रोहा कार केअरच्या अत्याधुनिक वॉशिंग सेंटरचा १० ऑगस्टला शुभारंभ: सुशिक्षित बेरोजगार तरुण रविंद्र झोरे याचे अनोख्या व्यवसायात पदार्पण 

वाकणनाका(सुनिल कोकळे) दि. ९ ऑगस्ट- रोहा तालुक्यातील व आसपासच्या परिसरातील वाहनांची स्वच्छता, देखभाल आणि आकर्षक लूक यावा यासाठी ‘रोहा कार केअर’ वॉशिंग सेंटरचा भव्य शुभारंभ सोमवार,दि.१० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. म्हाडा कॉलनी, मेन रोड, चनेरा, रोहा येथील खारी रोडजवळ हे अत्याधुनिक सेंटर सुरू होत आहे.

या सेंटरमध्ये वाहनधारकांसाठी संपूर्ण बॉडी वॉश, फोम वॉश, इंटिरियर क्लीनिंग, इंजिन क्लीनिंग, टू-व्हीलर वॉश तसेच फोर-व्हीलर वॉश अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहनांची स्वच्छता आणि देखभाल अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आधुनिक पद्धतींचा वापर करण्यात येणार आहे.

‘स्वच्छता हीच आमची ओळख’ या संकल्पनेतून ग्राहकांना दर्जेदार आणि समाधानकारक सेवा देण्याचा संकल्प रोहा कार केअरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. वाहन स्वच्छतेसोबतच दमदार आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर या सेंटरचा भर राहणार आहे.

शुभारंभानिमित्त नागरिकांनी आणि वाहनप्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच नव्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन रविंद्र झोरे व रोहित झोरे यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!