नागोठण्याच्या श्रेयाताई कुंटे यांच्यावर भाजपने सोपविली पुणे विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पदवीधर व शिक्षक मतदारसंघासह पर्वती विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी; भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

नागोठण्याच्या श्रेयाताई कुंटे यांच्यावर भाजपने सोपविली पुणे विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासह पर्वती विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी; भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा तथा आमदार चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सचिव श्रेयाताई केदार कुंटे यांच्यावर पुणे विभागातील भाजपा पदवीधर व शिक्षक मतदारसंघ तसेच पर्वती पुणे विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रचाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

              नागोठणे शहरासारख्या ग्रामीण भागातून पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय असलेल्या महिला पदाधिकाऱ्यावर भाजपने महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याने नागोठणे शहर व विभागातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्त भाजपा महिला कार्यकर्त्यांनी श्रेयाताई कुंटे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
                 यावेळी बोलताना श्रेयाताई केदार कुंटे म्हणाल्या की, आमच्या नेत्या आमदार चित्राताई वाघ यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीवर विश्वास दाखवून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्याबद्दल मी त्यांची मनापासून ऋणी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी ही जबाबदारी निष्ठेने व पूर्ण क्षमतेने पार पाडणार आहे.

पुणे विभाग भाजपा पदवीधर व शिक्षक मतदारसंघ तसेच पर्वती पुणे मतदारसंघात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांशी समन्वय साधून अथक परिश्रम घेणार असून, भाजपचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून आमदार चित्राताई वाघ यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार, असा विश्वासही श्रेयाताई कुंटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.


नागोठण्याच्या महिला नेतृत्वाला पुण्यात महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!