रोहा येथे लोकनेते दत्ता पाटील यांची १०० वी जयंती उत्साहात साजरी

वाकणनाका- सुनिल कोकळे (दि. ४ मार्च):

कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित कोएसो मेहेंदळे विद्या संकुलात स्वर्गीय लोकनेते ॲड. दत्ता पाटील (दादा) यांची १०० वी जयंती शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.

कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष, निष्णात वकील, उत्कृष्ट वक्ते, शेकापचे ज्येष्ठ नेते तसेच विधान परिषदेतील नामवंत विरोधी पक्षनेते म्हणून दादा यांची ओळख होती. वंचित बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी खेडोपाडी शाळारूपी ज्ञानगंगा पोहोचवून मोठे कार्य केले.

या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे चेअरमन संदीप गांगल व प्राचार्य रमेश मोसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी मेहेंदळे हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक के. आर. पाटील व नारायण पानसरे यांच्या हस्ते वंदनीय दादांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सोबत विलास जाधव, संग्राम गायकवाड, भिवा कोकरे, संदीप चांदोरकर, मारुती लोहकरे, अस्मिता तेंडुलकर, मनीषा निमण, मनीषा पाटील, समिता वाघमारे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी स्नेहल वाघ, महेंद्र पाटील, संदीप पवार, संतोष वाघमारे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान ज्येष्ठ शिक्षक नारायण पानसरे यांनी दादा यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, दत्ता पाटील यांनी सुमारे ५० वर्षे वकिली सेवा बजावत तळागाळातील अन्यायग्रस्त, गरीब जनतेला विनामूल्य न्याय मिळवून दिला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची “फुकट्या वकील” अशी ओळख निर्माण झाली होती.

ते झुंजार व निर्भीड वक्ते तसेच शिक्षणप्रेमी होते. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी ते शिक्षकांशी सतत संवाद साधत असत. शाळा, महाविद्यालये व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यावर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी लोकनेते स्व. दत्ता पाटील यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन केले.

इन डार्क शेड बनविणे

रोहा येथील मेहेंदळे हायस्कूलमध्ये स्वर्गीय लोकनेते ॲड. दत्ता पाटील(दादा) यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करताना के आर पाटील, नारायण पानसरे सोबत इतर सेवकवृंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!