पूरग्रस्त नागोठण्याची आमदार अनिकेतभाई तटकरे यांची पाहणी; तातडीच्या मदतकार्याचे निर्देश

पूरग्रस्त नागोठण्याची आमदार अनिकेतभाई तटकरे यांची पाहणी; तातडीच्या मदतकार्याचे निर्देश

नागोठणे ( शामकांत नेरपगार ) -: कोकण विभागाचे विधानपरिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी गुरुवारी सायंकाळी पूरग्रस्त नागोठणे व वाकण परिसराची पाहणी करून नागरिक व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बाजारपेठ, कोळीवाडा, मोहल्ला परिसर, खुमाचा नाका तसेच एस.टी. स्थानकासमोरील भागात त्यांनी कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष फेरफटका मारला. यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन, नरेंद्रशेठ जैन, दिलीपभाई टके, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके,  नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ मिलिंद धात्रक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, सदस्या पूनम काळे, नागोठणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जैन, उपाध्यक्ष अनिल काळे, दिलीप शहासने, बिकानेर मिठाई व्यापारी प्रतिनिधी रतन देवासी, अखलाक पानसरे, अतुल काळे, जोहेब कुरेशी, प्रथमेश काळे, ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे, प्रथमेश काळे, बिपीन सोष्टे, मंगेश तेरडे, शैलेश रावकर, सिराज पानसरे, रुचिर मोरे, मोहन नागोठणेकर, विजय शहासने, ॲड. श्रीकांत रावकर, मनोज टके, ॲड. रमेश जाधव, गुड्डू मोदी, रोशन पारंगे, समीर भिकन, अंकुश ताडकर, केतन भोय,  आलोक काळे, बंटी चोपडा आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                पूरग्रस्त भागाची पाहणीनंतर आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी पाटबंधारे, महसूल, वीज वितरण व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देत महसूल विभागास पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई देण्याचे निर्देश दिले.
              यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी अंबा नदीतील गाळ काढणे, पूरग्रस्त व्यापाऱ्यांना विमा दाव्यांबाबत मदत करणे व गावासाठी रिलायन्स कंपनी कडून शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे आदी मागण्या मांडल्या. पूरपूर्व इशारा प्रणालीबाबत महसूल विभागाने यंदा निष्काळजीपणा केल्याची तक्रार व्यापारी वर्गाने केली. त्यानंतर आमदार तटकरे यांनी रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांच्याकडून यासंदर्भात माहिती घेतली.
                   दरम्यान, पूरस्थितीबाबत संपर्क साधताना तहसीलदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी केला असून तहसील कार्यालयातील कथित एजंटगिरीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!