मनसेचे शिवराज पोलसानी यांनी घेतले श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन
देवस्थान विश्वस्त व उत्सव समितीच्या वतीने पोलसानी यांचा सत्कार
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) :
नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष शिवराज गोवर्धन पोलसानी यांनी नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव दिलीपभाई टके, विश्वस्त मंडळ तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिवराज पोलसानी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव दिलीपभाई टके, जयराम पवार, उत्सव समिती अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, उपाध्यक्ष संतोष चितळकर, खजिनदार सतीश पाटील, सदस्य अनंत चितळकर, मच्छिंद्र साळुंखे, रोहीदास हातनोलकर, उत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितीन राऊत, ज्येष्ठ ग्रामस्थ नारायण तेलंगे, हेमंत कामथे, बबलू खंडागळे, मंगेश कामथे, किरण काळे, विशाल खंडागळे, प्रशांत पानकर, निलेश म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात झालेल्या या भेटीने देवस्थान परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

