२० मार्च रोजी खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते धनगर समाज भवनाचे भूमिपूजन;धनगर बांधवांनी उपस्थित राहण्याचे अध्यक्ष मधुकर ढेबे यांचे आवाहन
वाकणनाका (सुनिल कोकळे )दि.१८ मार्च
धनगर समाजाच्या एकात्मतेस बळकटी देण्यासाठी व समाजाच्या विविध उपक्रमांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी या उद्देशाने जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था(अलिबाग,पेण, रोहा)मर्यादित धनगर समाज भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दि २०मार्च रोजी नागोठणे जवळील वेलशेत येथे सायंकाळी ४:०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी रायगडचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. तसेच रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, नरेंद्र जैन, नागोठणे विभागातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीपभाई टके,जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मधुकर ढेबे यांच्यासह उपाध्यक्ष राम केंडे, कार्याध्यक्ष राम बोडेकर, खजिनदार सुनिल कोकळे, सचिव राजू आखाडे व सर्व पदाधिकारी इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाला एक समाज भवन मिळावे यासाठी प्रयत्न करत असणारे अध्यक्ष मधुकर ढेबे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे आणि त्यामुळे सबंध धनगर बांधवांचे समाज भवनाचे स्वप्न साकार होणार आहे. तरी
कार्यक्रमास जास्तीत जास्त धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मधुकर ढेबे यांनी समाजबांधवांना केले आहे.
जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेच्या स्वमालकीच्या जागेची साफसफाई व जय्यत तयारी करताना जेष्ठ समाजसेवक तथा मार्गदर्शक धावू केंडे, समाजाचे युवा नेतृत्व संदीप केंडे, सदस्य चंद्रकांत केंडे व ग्रामस्थ

