नागोठण्यात दिलीपभाई टके यांच्या निवासस्थानी ठाणे नगरसेविका नम्रता भोसले यांची सदिच्छा भेट
नागोठणे (शामकांत नेरपगार )
नागोठणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपभाई टके यांच्या निवासस्थानी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ठाणे येथील नगरसेविका नम्रता भोसले – जाधव यांनी नुकतीच सदिच्छा भेट देत त्यांचे व दीपाली दिलीप टके यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी नम्रता भोसले – जाधव यांचे दिलीपभाई टके कुटुंबियांकडून कौटुंबिक स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान त्यांनी दिलीपभाई टके व दीपाली टके यांच्या तब्येतीची आपुलकीने विचारपूस केली.
या प्रसंगी नम्रता भोसले – जाधव व दिलीपभाई टके यांच्यात राजकीय तसेच कौटुंबिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. परिसरातील सामाजिक, राजकीय घडामोडी तसेच स्थानिक प्रश्नांवरही दोघांमध्ये मनमोकळ्या गप्पा रंगल्या. या भेटीत आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते. दिलीपभाई टके कुटुंबियांची भेट घेतल्या नंतर नम्रता भोसले – जाधव ह्या त्यांच्या गुहागर या मुळ गावी रवाना झाल्या.
दिलीपभाई टके हे नागोठणे परिसरातील एक ज्येष्ठ व लोकप्रिय राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांना भेटण्यासाठी अनेक मान्यवर नेहमी त्यांच्या निवासस्थानी येत असतात. दरम्यान, नम्रता भोसले यांनी दिलीपभाई टके यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे कौतुक करत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.
- नम्रता भोसले – जाधव ह्या ठाणे प्रभाग क्रमांक 19 मधून विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या असून त्या कोपरी पाच पाखडी विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना उपशहर प्रमुख आहेत. नम्रता भोसले – जाधव यांनी ठाणे मिरा भाईंदर महानगरपालिका वृक्ष व प्राधिकरण सदस्या म्हणून उल्लेखनीय काम केले आहे.

