नागोठण्यात मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्राथमिक आरोग्य केंद्र अत्याधुनिक करण्याची जोरदार मागणी
नागोठणे ( शामकांत नेरपगार ) –
नागोठणे येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकप्रिय तरुण उद्योजक तथा नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नागोठणे शहर विभाग, आदर्श चॅरिटेबल ट्रस्ट, एम.पी.सी.टी. हॉस्पिटल (सानपाडा, नवी मुंबई) आणि यू.एम.सी. ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. ५ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात एकूण ५८ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर रक्तदान शिबिरात २० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. यावेळी नागरिकांनी सुमितदादा काते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नागोठण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अत्याधुनिक करण्याची मागणी केली.
यावर प्रतिक्रिया देताना सुमितदादा काते यांनी उपमुख्यमंत्रीना. एकनाथ शिंदे, नामदार भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या सहकार्याने तसेच जिल्हा परिषदेमार्फत लवकरच आरोग्य केंद्राचे अत्याधुनिकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

शिबिराचे उद्घाटन सुमितदादा काते यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना नेते कृष्णा धामणे, रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, दिनेश घाग, विजय धामणे, प्रविण ताडकर,प्रकाश मोरे, लहुशेठ तेलंगे, शंकर ठाकूर, वर्षा सहस्त्रबुद्धे, शबाना मुल्ला, असिफ मुल्ला, नितीन पत्की, नरेश भंडारे, संजय कणघरे, निलेश साळवी, बुवा ईप्ते,अशोक कोतवाल,मंदार कोतवाल, हरेश धामणे, विनोद धामणे, बाळू रटाटे यांच्यासह एम.पी.सी.टी. हॉस्पिटलचे डॉ. भावेश घरत, डॉ. रिचा भालेराव, आदर्श चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदर्श जाधव तसेच अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एम.पी.सी.टी. हॉस्पिटलचे डॉ. भावेश घरत व डॉ. रिचा भालेराव यांनी नागरिकांची तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले.

या शिबिरात ईसीजी, रक्तदाब, मधुमेह व तोंडाचा कर्करोग यांसारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. तपासणी झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

