उद्या नागोठण्यात मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन; नवनिर्वाचित राजिप सदस्य सुमितदादा काते यांचा स्तुत्य उपक्रम

Screenshot

उद्या नागोठण्यात मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन; नवनिर्वाचित राजिप सदस्य सुमितदादा काते यांचा स्तुत्य उपक्रम

वाकणनाका (सुनिल कोकळे) – दि. ४ मे 

नागोठणे परिसरातील लोकप्रिय तरुण उद्योजक तथा नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना नागोठणे विभाग यांच्या संकल्पनेतून तसेच आदर्श चॅरिटेबल ट्रस्ट, एम.पी.सी.टी. हॉस्पिटल, नवी मुंबई आणि यू.एम.सी. ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि.०५ मे) रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, नागोठणे (जि. रायगड) येथे पार पडणार आहे. या शिबिरात नागरिकांसाठी खालील मोफत तपासण्या उपलब्ध असतील त्यामध्ये ईसीजी तपासणी, रक्तदाब तपासणी, तोंडाचा कर्करोग तपासणी, मधुमेह तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना नागोठणे विभाग या आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे पूर्व नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!