नागोठणे भाएसोचा शास्त्र शाखेत दमदार निकाल; १२ वीला ९७.२२% यशाने पालक वर्ग खुश / नागोठणे उर्दू ज्युनिअर कॉलेजचा निकाल उज्ज्वल; यशाची परंपरा कायम

नागोठणे भाएसोचा शास्त्र शाखेत दमदार निकाल; १२ वीला ९७.२२% यशाने पालक वर्ग खुश 

नागोठणे (शामकांत नेरपगार) :

नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने इयत्ता १२ वी (एच.एस.सी.) शास्त्र शाखेच्या मार्च/एप्रिल २०२६ परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत ९७.२२ टक्के निकाल नोंदविला आहे. या उज्ज्वल यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकवर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या परीक्षेत कुमारी सौमिली भुनीया हिने ८२.३३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कुमार रीतविक वुरीति याने ७९.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर कुमार देवांश लवटे याने ७७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन, सुरेश जैन, कार्तिक जैन तसेच मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नागोठणे उर्दू ज्युनिअर कॉलेजचा निकाल उज्ज्वल; यशाची परंपरा कायम

नागोठणे (शामकांत नेरपगार) :

नागोठणे एज्युकेशन सोसायटी संचलित उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नागोठणे यांनी यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. रोहा तालुक्यातील उर्दू माध्यमाचे एकमेव ज्युनिअर कॉलेज म्हणून या संस्थेची विशेष ओळख आहे.

मार्च २०२६ च्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल २ मे २०२६ रोजी जाहीर झाला. कला शाखेचा निकाल ७५ टक्के लागला असून एकूण ४ विद्यार्थ्यांपैकी ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कुमारी पिंजारी अंजमा साबीर हिने ५२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. कुमारी सिपाई मुस्कान नझीर हिने ४५ टक्के गुणांसह द्वितीय, तर कुमार मुजावर अबुबकर बालब याने ४२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

तसेच वाणिज्य शाखेचा निकाल ७० टक्के लागला असून एकूण २० विद्यार्थ्यांपैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कुमारी मुल्ला नेहा नदीम हिने ६५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. कुमारी शेख सनीला इसहाक हिने ५८.६७ टक्के गुणांसह द्वितीय, तर अन्सारी इफ्रा परवीन हरून हिने ५५.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

अशा प्रकारे कॉलेजचा एकूण निकाल ७०.८३ टक्के लागला आहे. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन समदशेठ अधिकारी, जनरल सेक्रेटरी लियाकतशेठ कडवेकर, व्यवस्थापकीय संचालक सगीर अधिकारी, शब्बीर पानसरे, डॉ. सादिया दफेदार तसेच प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!