सेवा सप्ताहातील उत्कृष्ट उपक्रमांसाठी डिस्ट्रिक्टमध्ये नागोठणे लायन्स क्लबला तृतीय क्रमांक : अध्यक्ष विलास चौलकर यांची सर्वत्र प्रशंसा

सेवा सप्ताहातील उत्कृष्ट उपक्रमांसाठी डिस्ट्रिक्टमध्ये नागोठणे लायन्स क्लबला तृतीय क्रमांक

अध्यक्ष विलास चौलकर यांची सर्वत्र प्रशंसा

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी कार्याची उज्ज्वल परंपरा कायम राखणाऱ्या नागोठणे लायन्स क्लबने अध्यक्ष विलास चौलकर यांच्या नेतृत्वाखाली सेवा सप्ताहादरम्यान राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची दखल घेत लायन्स डिस्ट्रिक्टमध्ये तृतीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे नागोठणे लायन्स क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दरम्यान लायन्स क्लब अध्यक्ष विलास चौलकर यांच्या नेतृत्वाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

अध्यक्ष लायन विलास चौलकर यांच्या नेतृत्वाखाली सेवा सप्ताहात विविध सामाजिक, जनजागृती व सेवाभावी उपक्रमांचे प्रभावी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन, अंमलबजावणी आणि सादरीकरण यामुळे नागोठणे क्लबला हा बहुमान मिळाला. “हा पुरस्कार म्हणजे केवळ क्रमांकाचे यश नसून क्लबच्या प्रत्येक सदस्याच्या एकजुटीचा, मेहनतीचा आणि सेवाभावाचा गौरव आहे,” अशी भावना अध्यक्ष विलास चौलकर यांनी व्यक्त केली.

या यशात एमजेएफ लायन यशवंत चित्रे यांचे विशेष योगदान राहिले. त्यांनी सेवा सप्ताहातील उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण तसेच क्लबच्या गार्डन व ऑफिसच्या थ्री डी प्रतिमांच्या माध्यमातून क्लबची जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली. तसेच ॲक्टिव्हिटी चेअरपर्सन लायन विवेक सुभेकर यांनी सेवा सप्ताहातील उपक्रमांचे नियोजन व यशस्वी अंमलबजावणीसाठी घेतलेले परिश्रमही महत्त्वपूर्ण ठरले.

वाशी नवी मुंबई येथे झालेल्या फिलाईट डे कार्यक्रमात नागोठणे लायन्स क्लबला हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ लायन प्रविण सरनाईक, पास्ट इंटर नॅशनल डायरेक्ट लायन विजयकुमार राजू, खास निमंत्रित पीआयडी पंकजकुमार मेहता, फर्स्ट व्ही. डी. जी. लायन विजय गणात्रा सेकंड व्ही.डी.जी. लायन डॉ. नमिता मिश्रा, आयपीडीजी लायन संजीव सूर्यवंशी, ऍडवीझर पीएमसीसी ऍड. सुभाष भालवाल, जीएसटी चेअरमन पीएमजेएफ लायन अनिल म्हात्रे यांच्यासह लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना अध्यक्ष लायन विलास चौलकर, एमजेएफ लायन यशवंत चित्रे, एमजेएफ लायन विवेक सुभेकर, सेक्रेटरी डॉ. लायन अनिल गिते, सहसेक्रेटरी लायन विजय शहासने, सहखजिनदार लायन विद्या म्हात्रे तसेच लायन अनुराधा शहासने, लायन संतोष शहासने, लायन सखाराम ताडकर व लायन ॲड. महेंद्र धामणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!