नाभिक समाजाची सुकन्या माधवी मोरे यांची ‘आशा’ स्वयंसेविका म्हणून नियुक्ती : समाज भगिनींकडून सत्कार
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) – प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे अंतर्गत नागोठणे कोळीवाडा येथे रिक्त असलेल्या एका आशा स्वयंसेविका पदासाठी अध्यक्ष, आशा स्वयंसेविका निवड समिती, रोहा यांच्या मान्यतेने प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी, ता. रोहा येथे पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या निवड प्रक्रियेत नागोठणे येथील नाभिक समाजाची सुकन्या माधवी अमित मोरे यांची आशा स्वयंसेविका म्हणून नियुक्ती करण्यात आली.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती रोहा यांच्यामार्फत झालेल्या या नियुक्तीबद्दल नागोठण्यात श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अनुषंगाने नाभिक समाज भगिनींच्या वतीने माधवी अमित मोरे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी नाभिक समाजाचे मार्गदर्शक दिलीपभाई टके, नाभिक संघ नागोठणे विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष मिलिंद गुजर, कार्याध्यक्ष शैलेश रावकर, शहर अध्यक्ष सुधाकर निंबाळकर, खजिनदार रविंद्र टके, सचिव दिगंबर खराडे आदी समाजातील प्रमुख मान्यवरांसह दिपाली दिलीप टके, महिला आघाडी अध्यक्षा कल्पना हरीश टके, नम्रता महेंद्र माने, दर्शना दिगंबर खराडे, हेमलता शामकांत नेरपगार, प्रियांका मनोज टके, सारिका सुधाकर निंबाळकर, मालती मधुकर निंबाळकर, मानसी महेंद्र पवार, प्रगती रमेश जाधव, मीनल मिलिंद गुजर, मीना राजेंद्र माने, प्रभा शेखर टके यांच्यासह नाभिक समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माधवी मोरे यांच्या नियुक्तीबद्दल समाजातील उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

