नागोठण्यात संत सेना महाराजांच्या नामस्मरणाने भक्तिमय वातावरण
श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरी
नागोठणे, रायगड (शामकांत नेरपगार) : नाभिक समाजाचे थोर संत श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मंगळवार दि. ८ सप्टेंबर रोजी नागोठणे शहर व विभाग नाभिक संघ तसेच महिला आघाडी, नागोठणे यांच्या वतीने ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणातील श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. समाजाचे आधारस्तंभ व मार्गदर्शक दिलीपभाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यतिथीनिमित्त सकाळी ९ ते ९.३० वाजता कळस पूजन श्रेयस महेंद्र पवार व सौ. कोमल श्रेयस पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर सकाळी १० ते ११ वाजता संत सेवा मंडळ, नागोठणे पंचक्रोशी यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळी ११ ते १२ या वेळेत ह.भ.प. श्री. शुभाष महाराज शेळके (सांबरी) यांचे प्रवचन झाले.
यानंतर उपस्थित समाज बांधवांनी संत शिरोमणी सेना महाराजांची आरती व पूजापाठ करून भक्तिभावाने अभिवादन केले. दुपारी १२ ते १ या वेळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच समाजातील मान्यवरांचा सत्कार समाजाचे मार्गदर्शक दिलीपभाई टके यांच्या हस्ते करण्यात आला.

गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप
खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी मोठी मदत होणार असून, सामाजिक बांधिलकीचा आदर्श संदेश या माध्यमातून देण्यात आला.
दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत समाज बांधव व उपस्थित मान्यवरांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर सायंकाळी ३ ते ५ या वेळेत महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत संत सेवा मंडळ, नागोठणे यांच्या वतीने हरिपाठाचा कार्यक्रम संपन्न झाला. संत सेना महाराजांच्या नामस्मरणाने आणि हरिपाठाच्या भक्तिमय वातावरणात दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास नाभिक समाजाचे मार्गदर्शक दिलीपभाई टके, नाभिक संघ नागोठणे विभाग अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष मिलिंद गुजर, कार्याध्यक्ष शैलेश रावकर, शहर अध्यक्ष सुधाकर निंबाळकर, खजिनदार रविंद्र टके, सचिव दिगंबर खराडे यांच्यासह मनोज गायकवाड, उदंड रावकर, हरीश टके, शामकांत नेरपगार, महेंद्र माने, शिवाजी नेरपगार, मंगेश गायकवाड, ह.भ.प. बापू महाराज रावकर, भाई शिंदे, शेखर टके, ॲड. श्रीकांत रावकर, मनोज टके, चेतन टके, ॲड. रमेश जाधव, सचिन नेरपगार, महेंद्र पवार, विवेक रावकर, विनायक निंबाळकर, शंकर चव्हाण, राकेश शिर्के, दीपक पवार, सिताराम टके, संजय टके, संतोष माने, संदीप जाधव, मोहन देवकर, राजेंद्र माने आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

महिला आघाडी अध्यक्षा कल्पना टके यांच्यासह दिपाली दिलीप टके,मनिषा टके, नम्रता माने, दर्शना खराडे, हेमलता नेरपगार, प्रियांका टके, सारिका निंबाळकर, लता मोहिते, शालिनी जाधव, प्रगती जाधव, मनोरमा रावकर, जयश्री दिवेकर, विजया चव्हाण, नीता रावकर, मीना माने, स्मिता गुजर, माधवी मोरे, श्रद्धा जाधव, राधा टके, सुनीता गुजर, सारिका जाधव, रोहिणी रावकर यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

