कै. तात्यासाहेब टके यांच्या प्रेरणेने पत्रकार असोसिएशनचे कार्य उल्लेखनीय – खा. सुनील तटकरे
नागोठणे पत्रकार असोसिएशनचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नागोठणे (शामकांत नेरपगार) – नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा १४ वा वर्धापन दिन श्री जोगेश्वरी माता प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे होते.
यावेळी बोलताना खासदार तटकरे यांनी “कै. तात्यासाहेब टके यांच्या प्रेरणेने नागोठणे पत्रकार असोसिएशन सातत्याने उत्कृष्ट कार्य करत आहे,” असे गौरवोद्गार काढले. गेल्या १४ वर्षांपासून असोसिएशनने पत्रकार, मान्यवर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून समाजात सकारात्मक कार्याला चालना दिली आहे.
आजच्या सोशल मीडियाच्या स्पर्धात्मक युगातही नागोठणे पत्रकार असोसिएशनच्या पत्रकारांनी आपली ओळख टिकवून ठेवली आहे, हे त्यांच्या जिद्दीचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार तटकरे यांनी नागोठणे शुद्ध पाणी योजनेतील अडचणी दूर करून नागरिकांना लवकरच शुद्ध पाणी मिळवून देण्याचे सांगितले. तसेच शासनाकडे पाठपुरावा करून नागोठणे तालुका निर्मितीसाठी मान्यता मिळवून देण्याचे अभिवचन दिले.
असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त खालील पत्रकारांना यशवंत कांबळे (दापोली) – कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, प्रशांत शेडगे (पनवेल) – उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, परेश शिंदे (माणगाव) – युवा पत्रकार पुरस्कार देवून खासदार तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा १४ वा वर्धापन दिन श्री जोगेश्वरी माता प्रांगणात शुक्रवारी दि. २०मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित पत्रकार मान्यवर व ग्रामस्थ यांना संबोधित करताना खासदार सुनील तटकरे बोलत होते.
या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत राजिप सदस्य सुमितदादा काते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, नरेंद्रशेठ जैन, दिलीपभाई टके, रायगड जिल्हा दिशा समिती सदस्य शिवरामभाऊ शिंदे, नागोठणे सहकारी भातगिरणीचे सभापती सदानंद गायकर, मधुकर ठमके, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, सुधागड पंचायत समितीचे उपसभापती संदेश शेवाळे, प्रसिद्ध उद्योजक राजेश मपारा, सोपानभाऊ जांबेकर, नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे विभाग अध्यक्ष संतोष कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, माजी सरपंच विलास चौलकर, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सद्दाम दफेदार, नागोठणे उपसरपंच अकलाख पानसरे, प्रियदर्शनी संस्थेचे अध्यक्ष शैलेश रावकर, दिनेश घाग, ओमया कंपनीचे कॉलेटी अँड लीगल मॅनेजर कैलास पाटील,मुंबई एमएसएनएल मॅनेजर किशोर खेविलकर, अमळनेर येथील हायस्कुलचे मुख्याध्यापक अनिल चौधरी, फिजिओ थेरफीस्ट डॉ.अनिल दुसाने, इंडस्ट्रिअल सेफ्टी कन्सलटंट विष्णू सोनवणे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
खासदार सुनील तटकरे पुढे म्हणाले कि, रिलायन्सच्या वाढीव प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे. त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच मुलांना नोकरीयोग्य शिक्षण दिल्यास त्यांना रोजगारापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही,” असा सल्ला देखील खासदार तटकरे यांनी दिला.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून तुकाराम खांडेकर गुरुजी, उद्धव सिताराम रावकर, भास्कर सोलेगावकर सर, मोहन नागोठणेकर,प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, विकास खांडेकर, राम नाकती, कु. तन्मय गणेश नेरपगार, सौ. सिमीन रमिज दफेदार , कुमारी प्रेरणा निवास कदम, कु. ओमकार भालचंद्र शिर्के, कुमारी अनुष्का विनोद भोईर कु. प्रशांत सारंग, कु. तनिषा संतोष बैकर, कुमारी नेहा हिमांशु दोरे, कुमार अनिश किरण पालकर, कु. अर्णव श्रीकांत रावकर यांचा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष ॲड. महेश पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राकेश तेलंगे यांनी केले. असोसिएशनचा वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे मार्गदर्शक दिलीपभाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष ॲड. महेश पवार, सचिव अनिल पवार, खजिनदार किशोर कदम, सहसचिव राजेंद्र जोशी तसेच सदस्य विनोद भोईर, सुनिल कोकळे, दिनेश ठमके, चेतन टके, सचिन नेरपगार, राजेश पिंपळे, मंजुळा म्हात्रे, वर्षा सहस्त्रबुद्धे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

