धनगर समाज भवनाला गती : खासदार सुनील तटकरे यांचा विकासासाठी ठाम शब्द
येत्या वर्षीचं स्नेहसंमेलन हे समाज भवनातच होणार: अध्यक्ष मधुकर ढेबे
वाकणनाका (सुनील कोकळे) – धनगर समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी कटीबद्ध आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. नागोठणे जवळील वेलशेत येथे जय मल्हार धनगर समाज संस्थेच्या समाजभवनाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते दिमाखदार वातावरणात पार पडले.
धनगर समाजाने डोंगरकपारीत राहूनही गेल्या ६५ वर्षांपासून वार्षिक स्नेहसंमेलनाची परंपरा जपली आहे. या परंपरेमुळे समाजातील एकजूट अधिक बळकट झाली आहे. आता हीच एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या जागेत भव्य समाजभवन उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी खासदार तटकरे म्हणाले की,
समाजभवनाचा आराखडा सर्व सोयी-सुविधांचा विचार करून उत्कृष्ट बनवावा. निधी उभारणीसाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू. तसेच उद्घाटनालाही मी स्वतः उपस्थित राहीन.
त्यांनी समाजाच्या पदाधिकाऱ्यांना कामात कोणताही विलंब न करता त्वरित सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या.
या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, रोहा पंचायत समिती सदस्या समृद्धी संतोष कोळी,शिवरामभाऊ शिंदे, नागोठणे विभाग अध्यक्ष संतोष कोळी,नागोठणे माजी सरपंच विलास चौलकर, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, अनंता देशमुख,उदय जवके,प्रमोद जांबेकर, सचिन कळसकर, वणी सरपंच प्रगती आवाद,सुधाकर पारंगे, जय मल्हार धनगर समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष मधुकर ढेबे, माजी अध्यक्ष गंगाराम कोकळे,सचिव लक्ष्मण ढेबे,माजी उपाध्यक्ष भाऊ केंडे, उपाध्यक्ष रामभाऊ केंडे, कार्याध्यक्ष रामा बोडेकर,खजिनदार सुनील दादू कोकळे,मुख्य सल्लागार जयेश ढेबे, सल्लागार धाऊ केंडे, सचिव राजु आखाडे,ज्येष्ठ समाजसेवक जानू कोकळे, जानू कोकरे यांच्यासह संस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, जो खासदार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.धनगर समाजाच्या विकासासाठी उभारले जाणारे हे समाजभवन एकतेचे व प्रगतीचे प्रतीक ठरणार असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पुंडलिक ताडकर यांनी केले तर हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी जय मल्हार धनगर समाज संस्थेचे सहकार्याध्यक्ष विजय उघडे,सल्लागार धाऊ कोकळे,धाऊ केंडे,सहसचिव संदीप ढेबे , सह खजिनदार चंद्रकांत बावधाने, सदस्य मंगेश कोकळे,रविंद्र बोडेकर,धाऊ झोरे,धाऊ आखाडे, हरेश कोकरे,गजानन झोरे,जगन कोकळे,राया तुकाराम ढेबे,नामदेव झोरे आणि राम झोरे आदींनी परिश्रम घेतले.

