नागोठण्यात घरोघरी गुढी उभारून मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत

नागोठण्यात  घरोघरी गुढी उभारून मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत

वाकणनाका: (सुनिल कोकळे)

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त नागोठणे शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. घरोघरी गुढी उभारून नागरिकांनी मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत केले.

पहाटेपासूनच नागरिकांनी आपल्या घरांसमोर सुंदर रांगोळ्या काढून गुढी उभारली. गुढीला रेशीम वस्त्र, फुले, कडुलिंब, साखरगाठी आणि कलशाने सजवून शुभतेचे प्रतीक मानले गेले. नवीन कपडे परिधान करून कुटुंबीयांनी एकत्र येत सण साजरा केला.

या निमित्ताने शहरातील विविध मंदिरांमध्ये विशेष पूजा व आरतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच काही ठिकाणी पारंपरिक वेशभूषा परिधान करून नागरिकांनी सण साजरा केला.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत नव्या वर्षाच्या स्वागताचा आनंद लुटला. उत्साह, आनंद आणि नवचैतन्याने भरलेला हा सण नागोठणे शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!