नागोठणे गवळआळीत उद्या श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळा; भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन

नागोठणे गवळआळीत उद्या श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळा; भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन

नागोठणे (शामकांत नेरपगार) – रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे येथील गवळआळी येथील श्री साईबाबा मंदिरात गुरुवार (दि.२६) मार्च रोजी शिवसह्याद्री मित्रमंडळ गवळआळी व ग्रामस्थ मंडळ गवळआळी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबा उत्सव व भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगलमय सोहळ्यास नागोठणे शहर व परिसरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दुपारी होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
                    कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ०८:०० वाजता माजी सरपंच तथा राधाकृष्ण-गणपती-साईबाबा मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष विलास चौलकर व सौ. श्वेता चौलकर यांच्या हस्ते श्री साईबाबा दुग्धाभिषेकाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ०९:०० वाजता संदिप राऊत व ग्रामपंचायत सदस्या सौ. ज्योती राऊत यांच्या हस्ते ध्वजपूजन, तर सकाळी १०:०० वाजता गणेश घाग, सौ.प्राची घाग, सिद्धेश कदम, सौ. स्नेहल कदम, दिनेश वादळ, सौ.योगिता वादळ, संदिप वाजे, सौ.मोनिका वाजे, प्रणव वादळ, सौ.साक्षी वादळ, प्रथमेश पाटील, सौ. विशाखा पाटील यांच्या हस्ते पुजाविधी, होमहवन, दुपारी १२:०० वाजता श्री साईबाबांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी व महाआरती होईल. त्यानंतर दुपारी ०१:०० वाजता किरण वादळ व सौ. साक्षी वादळ यांच्या वतीने साईभंडारा (महाप्रसाद) आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ०५:०० वाजता श्री साईबाबांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून रात्री १०:०० वाजता आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
   

    “हा उत्सव यशस्वी करण्यासाठी विलास चौलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसह्याद्री मित्रमंडळ अध्यक्ष संदिप राऊत, उत्सव समिती अध्यक्ष शेखर जोगत, उपाध्यक्ष शुभम घाग, सचिव सुजित चौलकर, सहसचिव राजू पाटील, खजिनदार दर्शन वादळ, सहखजिनदार प्रशांत नाकटे, कार्याध्यक्ष रुपेश जगताप तसेच सनिल धुमाळ व गवळआळी ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!