नागोठण्यात शिक्षण क्षेत्राला बळ : राजिप उपाध्यक्ष मधुकरशेठ पाटील यांची भाएसो विद्या संकुलास सदिच्छा भेट : तांत्रिक शिक्षणाच्या दर्जाचे कौतुक; विकासासाठी एकत्र काम करण्याची ग्वाही

नागोठण्यात शिक्षण क्षेत्राला बळ : राजिप उपाध्यक्ष मधुकरशेठ पाटील यांची भाएसो विद्या संकुलास सदिच्छा भेट : तांत्रिक शिक्षणाच्या दर्जाचे कौतुक; विकासासाठी एकत्र काम करण्याची ग्वाही

नागोठणे (शामकांत नेरपगार) – रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष मधुकरशेठ पाटील यांनी नागोठणे जवळील वेलशेत येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलास मंगळवार (दि.२४) मार्च रोजी सायंकाळी सदिच्छा भेट दिली.


                   यावेळी त्यांनी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, डिप्लोमा इंजिनियरिंग, डी. फार्मसी, सेफ्टी इंजिनियरिंग आदी विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांना नोकरीयोग्य शिक्षण देण्याच्या भाएसोच्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
                  दरम्यान, संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन यांनी मधुकरशेठ पाटील यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेला जेव्हा गरज भासेल तेव्हा मी सदैव तुमच्यासोबत असेन, अशी ग्वाही मधुकर पाटील यांनी दिली.
                 तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका व नागोठणे परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी किशोरभाई जैन व मधुकरशेठ पाटील यांच्यात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. या प्रसंगी मधुकरशेठ पाटील यांचे सुपुत्र अमित पाटील यांचीही उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!