नागोठणे येथे रोहा तालुका कुंभार समाजाची बैठक; नवीन अध्यक्षांची निवड

नागोठणे येथे रोहा तालुका कुंभार समाजाची बैठक; नवीन अध्यक्षांची निवड

वाकणनाका (सुनिल कोकळे) दि.२३मार्च
नागोठणे कुंभारआळी येथील गणेश मंदिरात (दि.२२ मार्च) रोजी रोहा तालुका कुंभार समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गजानन चौलकर प्रमुख उपस्थित होते.

सदरील बैठकीत तालुका कुंभार समाजाच्या नवीन कार्यकारिणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विद्यमान तालुका अध्यक्ष दिपक शंकर नागोठणेकर तसेच महिला अध्यक्षा सौ.सपना राहुल मंगरूळकर यांनी स्वेच्छेने आपल्या पदांचा राजीनामा रायगड जिल्हा कुंभार समाज अध्यक्ष श्री. अनंत महाडकर यांच्याकडे सुपूर्द केला.

यानंतर श्री.अनंत महाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन तालुका अध्यक्ष म्हणून शाम दत्तात्रेय धाटावकर (रोहा) तर महिला अध्यक्षा सौ. सुजाता किशोर नागोठणेकर (नागोठणे) यांची एकमताने निवड करण्यात आली.

पुढील कार्यकारिणीची नेमणूक नव्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच तालुका बैठकीत करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शेवटी जिल्हा अध्यक्ष अनंत महाडकर यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यावेळी नागोठणे व रोहा येथील कुंभार समाजाचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!