काँग्रेसच्या रायगड दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी अशफाक पानसरे नागोठण्यात काँग्रेसला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार; तळागाळातील कार्यकर्त्यांना पुन्हा संघटित करण्याचा संकल्प

काँग्रेसच्या रायगड दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी अशफाक पानसरे
नागोठण्यात काँग्रेसला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार; तळागाळातील कार्यकर्त्यांना पुन्हा संघटित करण्याचा संकल्प

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) — काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत नागोठणे येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते अशफाक महमुद पानसरे यांची दक्षिण रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे (दक्षिण) जिल्हाध्यक्ष राजभाऊ ठाकूर यांनी दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांना नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी सोपविली.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतील संघटन सृजन अभियानांतर्गत तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्व व मान्यतेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करून काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
अशफाक पानसरे यांनी यापूर्वी नागोठणे शहर काँग्रेस अध्यक्ष म्हणून २००७ पासून काम पाहिले आहे.
तसेच रायगड जिल्हा काँग्रेस इंडस्ट्रियल सेलचे उपाध्यक्ष म्हणून २०२३ पासून ते कार्यरत आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ साठी त्यांनी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.
याशिवाय रायगड जिल्हा अल्पसंख्यांक दक्षता व संनियंत्रण समितीचे सदस्य म्हणून २०१२ ते २०१४ या कालावधीत, तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील रायगड जिल्हा शांतता समितीचे सदस्य म्हणून २०२२ ते २०२४ या कालावधीत त्यांनी काम केले आहे. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. अशपाक पानसरे यांचे वडील महामूदशेठ पानसरे हे नागोठणेचे तत्कालीन सरपंच होते.
मला मिळालेल्या पदाचा योग्य वापर करून नागोठणे शहर व परिसरात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविणार असून पक्ष संघटना अधिक मजबूत करणार आहे. काँग्रेस पक्षापासून दूर गेलेल्या तळागाळातील कार्यकर्त्यांचे गैरसमज दूर करून आपापसातील वादविवाद मिटविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन नागोठण्यात काँग्रेस पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देणार,असा विश्वास नवनिर्वाचित दक्षिण रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशफाक पानसरे यांनी व्यक्त केला.
अशपाक पानसरे यांच्या नियुक्तीमुळे नागोठणे शहर व परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, आगामी काळात पक्ष संघटन विस्तारासाठी अशपाक पानसरे यांचा अनुभवाचा उपयोग होणार आहे.
फोटो – अशपाक पानसरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!