अनिकेतभाई तटकरे यांची विधान परिषदेत पुन्हा दमदार एंट्री; वेलशेत-आंबेघरमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष
नागोठणे (शामकांत नेरपगार) – रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखले जाणारे आमदार अनिकेतभाई तटकरे हे बिनविरोध निवडून येत सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. त्यांच्या या विजयानंतर नागोठणेजवळील पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत-आंबेघर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला.

राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे विभागाध्यक्ष तथा पिगोंडे सरपंच संतोषभाई कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटप करण्यात आले. यावेळी “तटकरे साहेब जिंदाबाद”, “अनिकेतभाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है” तसेच “राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभाग अध्यक्ष संतोषभाई कोळी, युवा नेते,रोशन पारंगे, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय पारंगे, अनिल पाटील, पुंडलिक ताडकर, गंगाराम पारंगे, धनाजी पारंगे, अंकुश ताडकर, प्रमोद चोरगे, सम्राट ताडकर, प्रथमेश दिवकर, प्रशांत पारंगे, जितेंद्र पारंगे, निलेश मळेकर, अनुराग ताडकर, अमर ताडकर, प्रतिक पारंगे, विघ्नेश ताडकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

