फिट इंडिया अंतर्गत “एक दिवस स्वतःसाठी” सायक्लोथॉन २०२६ चे आयोजन

फिट इंडिया अंतर्गत “एक दिवस स्वतःसाठी” सायक्लोथॉन २०२६ चे आयोजन

वाकणनाका- सुनिल कोकळे

दि. ७ जून २०२६ : भारत सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “Sundays on Cycle – एक दिवस स्वतःसाठी” या विशेष सायक्लोथॉन उपक्रमाचे आयोजन रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ पोलीस अधीक्षक कार्यालय, अलिबाग येथून होणार असून नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती तसेच नियमित व्यायामाचे महत्त्व रुजविण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.
या कार्यक्रमास रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, विविध विभागांचे शासकीय अधिकारी, मान्यवर पाहुणे, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
       कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व सायकलस्वारांचा माणुसकी प्रतिष्ठान व उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणाऱ्या सहभागींचा सन्मान करून त्यांना पुढील सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
        या उपक्रमास माणुसकी प्रतिष्ठान, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, स्पर्धा विश्व अकॅडमी, लायन्स क्लब आणि अलिबाग सायकल रायडर्स यांचे सहकार्य लाभले आहे.
रायगड जिल्हा पोलीस दल तसेच सहभागी संस्थांच्या वतीने सर्व सामाजिक संस्था, युवक मंडळे, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्यवर्धक व जनजागृतीपर उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
🚴‍♂️ दिनांक : रविवार, ७ जून २०२६
⏰ वेळ : सकाळी ६.३० वाजता
📍 ठिकाण : पोलीस अधीक्षक कार्यालय, अलिबाग
आयोजक
रायगड जिल्हा पोलीस दल
सहयोगाने
माणुसकी प्रतिष्ठान | उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था |

“स्वतःसाठी एक तास, आरोग्यासाठी आयुष्यभराचा लाभ!” 🚴‍♂️🌿🇮🇳

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!