राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला वेग; वैशालीताई नागवडे व निखिल ठाकरे यांनी खासदार सुनिल तटकरे यांची घेतली सदिच्छा भेट
नागोठणे रायगड ( शामकांत नेरपगार ) – राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा वैशालीताई नागवडे व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार, लोकनेते सुनिल तटकरे यांची सुतारवाडी, रोहा येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी वैशालीताई नागवडे व निखिल ठाकरे यांचे स्वागत केले.
या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कामकाजासह महिला व युवक संघटनेच्या माध्यमातून पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे व विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महिला व युवक कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी केले.
या सदिच्छा भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीमुळे पक्षातील महिला व युवक आघाडीच्या संघटनात्मक हालचालींना अधिक बळ मिळणार असल्याचे दिसून आले.

