नागोठणे जवळील खैरवाडी आदिवासी ग्रामस्थांच्या महामार्ग संदर्भात समस्या सोडविण्यासाठी लोकनेते खासदार सुनील तटकरे उद्या खैरवाडी बस स्टॉपवार : अधिकारींना हजर राहण्याच्या सूचना

नागोठणे जवळील खैरवाडी आदिवासी ग्रामस्थांच्या महामार्ग संदर्भात समस्या सोडविण्यासाठी लोकनेते खासदार सुनील तटकरे उद्या खैरवाडी बस स्टॉपवार : अधिकारींना हजर राहण्याच्या सूचना

नागोठणे ( शामकांत नेरपगार ) — समाजातील अतिदुर्गम भागातील जनता असो वा सर्वसामान्य जनता असो यांच्या विविध प्रकारे समस्या सोडविण्यासाठी लोकनेते रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे नेहमी कार्यतत्पर असतात. मुंबई महामार्ग चौपदरीकरणाच्या कामकाजामुळे नागोठणे जवळील सुकेळी विभागातील खैरवाडी हद्दीतील वाघ्रणवाडी, मांडवशेत, नंबरवाडी, उसर या आदिवासी वाड्यावरील ग्रामस्थांना महामार्गवरून आपल्या वाड्यांकडे जाण्यासाठी व येण्यासाठी उदभवलेल्या रस्ता क्रॉसिंटच्या समस्या संदर्भात ग्रामस्थांचे नेते जानू हंबीर व भगवान शिद यांनी राष्ट्रवादीचे नेते दिलीपभाई टके यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ १०० ग्रामस्थांसह रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील गीताबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात लोकनेते खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन आपली समस्या कथन केली त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी तात्काळ राष्ट्रीय महामाग्राच्या संबंधित अधिकारीला शनिवार दि. २५ एप्रिल रोजी खैरवाडी स्टॉप वरहजर राहण्याचे आदेश देवून मी देखील सकाळी १० वाजता खैरवाडी बस स्टॉप वर उपस्थित राहतो अशा सूचना देऊन आदिवासी बांधवांना दिलासा दिला.

यावेळी यावेळी खैरवाडी व परिसरातील आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते दिलीपभाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, ऐनघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच भगवान शिद, सामाजिक कार्यकर्ते जानू वारगुडे आदींसह खैरवाडी, मांडवशेत, वाघ्रणवाडी, उसर नंबरवाडी या भागातील ग्रामस्थ व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आदिवासी समाजाचे नेते जानू वारगुडे व भगवान शिद यांनी राष्ट्रवादी नेते दिलीपभाई टके यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते खासदार सुनील तटकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हणतात की, आम्हा ग्रामस्थांना आमच्या गावाकडून येण्यासाठी व गावाकडं जाण्यासाठी रस्ता क्रॉस करावा लागतो आणि फक्त आणि हा रस्ता क्रॉस करण्यासाठी दोन किलोमीटर अंतर जावे लागते. यापूर्वी आम्हाला फक्त १०० मीटर देखील अंतर देखील क्रॉस करावे लागत नव्हते.

तसेच आम्ही रस्ता क्रॉस करताना बाजूलाच नाला आहे आणि पावसाळ्यात तो नाला तुडुंब वाहतो मग आम्ही आमच्या गावाकडे कसे जायचे व कसे आमचे दैनंदिन व्यवहार करायचे याचा आपण योग्य तो अभ्यास करून आम्हाला न्याय द्या अशी विनंती आदिवासी समाजाचे नेते जानू वारगुडे यांनी राष्ट्रवादीचे नेते दिलीपभाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली केलीआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!