नागोठण्यात पाणीटंचाईत मदतीचा हात : ज्योती राऊत यांच्याकडून हजार घरांना पिण्याच्या पाण्याचे वाटप
नागोठणे ( शामकांत नेरपगार ) – मुसळधार पावसामुळे नागोठणे तसेच परिसरातील सुमारे ४० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नागोठणे चिकणी येथील के.टी. बंधारा परिसरातील पाइपलाइन फुटल्याने गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला होता. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक ४ मधील नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी उबाठा शिवसेनेच्या नागोठणे ग्रामपंचायत सदस्या ज्योती संदीप राऊत व संदीप राऊत यांनी स्वखर्चाने कुंभार आळी, मराठा आळी, गवळआळी आणि रमाईनगर परिसरातील सुमारे एक हजार घरांमध्ये कीनली ब्रँडच्या पाण्याच्या बॉक्सचे (प्रत्येकी १२ बाटल्या) वाटप केले. या उपक्रमाबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
पाणीवाटप उपक्रमात प्रवीण आमडोसकर, सुनील धुमाळ, सुजित पाटील, शेखर जोगत, सूरज तळेकर, मयूर पाटील, निशांत पाटील, प्रशांत नाकते, यश आमडोसकर, सुशांत धुमाळ, ऋषिकेश भगत, गौरव वाघमारे, प्रमोद महाडिक, संचित भगत, रोहित कळमकर आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी ज्योती राऊत यांनी सहकार्यासाठी कीनली ब्रँडच्या अधिकाऱी मंगेश गोळे व कल्पेश मोरे यांचे विशेष आभार मानले.

