पत्रकार धम्मशील सावंत यांच्याशी ऑन फिल्ड RGSS सुरक्षा अधिकाऱ्याची मुजोरी

नागोठणे पोयनाड मार्गावर कडसुरे रिलायन्स मटेरियल गेटसमोर इसमाचा अपघात

कारच्या धडकेत गंभीर जखमी

अपघाताचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराच्या हातून RGSS सुरक्षा अधिकाऱ्याने जबरदस्तीने मोबाईल हिसकवला

पत्रकार धम्मशील सावंत यांच्याशी ऑन फिल्ड RGSS सुरक्षा अधिकाऱ्याची मुजोरी

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करणाऱ्या घटनेचा पत्रकार संघटनांकडून जाहीर निषेध

नागोठणे ( शामकांत नेरपगार ) –

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरील वाढते हल्ले, दबाव, मुस्कटदाबी सारख्या घटना वाढल्या असताना आता पत्रकारांना ऑन फिल्ड कर्तव्ये बजावण्यासाठी देखील रोखण्याचे काम काही महाभाग करीत आहेत. असाच संतापजनक प्रकार गुरुवारी रिलायन्स नागोठणे मटेरियल गेटसमोर घडला.

नागोठणे पोयनाड मार्गावर रिलायन्स कंपनीतील एका कारने एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात सदरची व्यक्ती गंभीर जखमी होऊन पायाला गंभीर दुखापत होऊन रस्त्यावर पडून होती.

रुग्णवाहिका येईपर्यंत प्रतीक्षा करीत असताना यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार धम्मशील सावंत यांनी टीव्ही चैनल व वृत्तपत्रात वार्तांकन करण्याच्या हेतूने मोबाईलमध्ये व्हिडीओ व फोटो घेण्यास सुरुवात केली. मात्र याच वेळी इथं उपस्थित असलेल्या रिलायन्स च्या आर जी एस एस च्या सुरक्षा अधिकाऱ्याने पत्रकार असल्याचे वारंवार सांगत असताना सुद्धा पत्रकार असलेत तरी व्हिडीओ करू शकत नाही असं सांगत हातातून मोबाईल खेचून घेतला.

सर्व अपघाती घटना दाबण्याच्या व त्या कुठंही प्रसिद्ध होऊ नयेत असा उद्देश कायम ठेवणाऱ्या या प्रवृत्तीने सदर पत्रकाराने वारंवार सांगून मोबाईल मागूनही मोबाईल दिला नाही. आपला मुजोर व उर्मठपणा कायम ठेवला. सफारीचा तोरा व रुबाब सर्वसामान्य व स्थानिकांवर दाखविण्याच्या तक्रारी नागरिकांतून वारंवार येत असताना चक्क पत्रकाराच्या कर्तव्ये व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे अधिकार तत्व पायदळी तुडविण्याचे काम या खाजगी सुरक्षा अधिकाऱ्याने केले, या कृतीचे व घटनेचा राज्यातील पत्रकार संघटनांसह , पत्रकारांनी निषेध दर्शविला आहे.

दरम्यान रिलायन्स व्यवस्थापन अशा मुजोर सुरक्षा अधिकाऱ्याला समज देणार की पुन्हा पुन्हा अशी मुजोरी करायला बळ देणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!