राज्य शासनाच्या जयंती दिनदर्शिकेत स्व. अजित अनंतराव पवार यांचा समावेश; २२ जुलै रोजी राज्यभर जयंती साजरी

राज्य शासनाच्या जयंती दिनदर्शिकेत स्व. अजित अनंतराव पवार यांचा समावेश; २२ जुलै रोजी राज्यभर जयंती साजरी

वाकणनाका(सुनिल कोकळे)दि.१७ जुलै – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सन २०२६ मध्ये राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांच्या जयंती आणि राष्ट्रीय दिनांच्या कार्यक्रमांमध्ये स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार बुधवार (दि.२२ जुलै २०२६)रोजी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे सहावेळा माजी उप मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या स्व. अजित अनंतराव पवार यांनी सार्वजनिक जीवनात अर्थात सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,आर्थिक व क्रिडा क्षेत्रात केलेल्या योगदानाची आठवण आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने शासनाच्या अधिकृत जयंती कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्यात आल्याची नोंद परिपत्रकात करण्यात आली असून, त्यानुसार राज्यभर हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

या संदर्भातील आवश्यक सूचना विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना देऊन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच हे परिपत्रक राज्यातील सर्व महाविद्यालये व शाळांनाही लागू राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!