रोहा येथे भारताची जनगणना २०२७ प्रशिक्षणास प्रारंभ

रोहा येथे भारताची जनगणना २०२७ प्रशिक्षणास प्रारंभ

वाकणनाका (सुनिल कोकळे), दि. २७ एप्रिल :

भारताची आगामी जनगणना प्रक्रिया सुरळीत आणि अचूक पार पडावी यासाठी रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात पर्यवेक्षक आणि प्रगणक यांचे प्रशिक्षण वर्ग दि. २७ एप्रिल ते दि २९ एप्रिल रोजी पर्यंत आयोजित करण्यात आले आहेत.

सदर प्रशिक्षण रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार रोहा प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड व रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गात प्रा. लोहकरे, पी. आर. पाटील आणि पी. पी. पाटील हे मार्गदर्शन करत आहेत.

या प्रशिक्षणामध्ये घरांची नोंदणी, कुटुंबीयांची माहिती संकलन, नकाशे,डिजिटल प्रणालीचा वापर तसेच जनगणना प्रक्रियेतील विविध बाबींवर सविस्तर माहिती देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील सुमारे १३० शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले असून आगामी जनगणना मोहिमेसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!