नागोठणे उपसरपंचपदी ज्ञानेश्वर साळुंखे यांची बिनविरोध निवड डॉ. मिलिंद धात्रक ठरले ‘किंगमेकर’; समर्थकांकडून जल्लोष

नागोठणे उपसरपंचपदी ज्ञानेश्वर साळुंखे यांची बिनविरोध निवड
डॉ. मिलिंद धात्रक ठरले ‘किंगमेकर’; समर्थकांकडून जल्लोष

नागोठणे (शामकांत नेरपगार) – नागोठणे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अकलाख पानसरे यांना जनसेवा विकास आघाडीचे नेते किशोरभाई जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. मुदत पूर्ण झाल्यानंतर अकलाख पानसरे यांनी मागील महिन्यात उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवार (दि. १२मे) रोजी नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक पार पडली.

सरपंच सुप्रिया महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीत सदस्य अॅड. प्रकाश कांबळे आणि ज्ञानेश्वर साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र जनसेवा विकास आघाडीचे नेते किशोरभाई जैन यांच्या निर्णयाचे स्वागत करत अॅड. प्रकाश कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे वार्ड क्रमांक ६ चे सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे यांची नागोठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच सुप्रिया महाडिक यांनी जाहीर केले.

दरम्यान, या निवडणुकीत पहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने ते ‘किंगमेकर’ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या निवडीची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.

उपसरपंच निवडणुकीच्या प्रसंगी नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक, ज्येष्ठ नेते संजय महाडिक, पहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी राकेश टेमघरे, मावळते उपसरपंच अकलाख पानसरे, नवनिर्वाचित उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे , सदस्य संतोष नागोठणेकर, सचिन ठोंबरे, अॅड.प्रकाश कांबळे, शबाना मुल्ला, पूनम काळे, सुप्रिया काकडे, भाविका गिजे, अमृता महाडिक, ज्योती राऊत, सुलताना लंबाते, जन्नत कुरेशी, विनिता पाटील, शहानाज अधिकारी, मंगी कातकारी, संजय काकडे, भरत गिजे, अनिल महाडिक, माजी उपसरपंच सुनिल लाड, बंटी मांडे, अजित दळवी, बबलू खंडागळे, रुपेश नागोठणेकर, अल्वीन नाकते यांच्यासह जनसेवा विकास आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!