सलग दुसऱ्यांदा आमदार झालेल्या अनिकेतभाई तटकरे यांचे सुतारवाडीत जल्लोषात स्वागत नागोठणे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सलग दुसऱ्यांदा आमदार झालेल्या अनिकेतभाई तटकरे यांचे सुतारवाडीत जल्लोषात स्वागत
नागोठणे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

नागोठणे (शामकांत नेरपगार) – रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे आमदार अनिकेतभाई तटकरे हे बिनविरोध निवडून येत सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. त्यांच्या या विजयाबद्दल रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे रविवारी (दि. ७ जून) कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आगमन झाल्यानंतर त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, गुलाब पुष्पांची उधळण करत आणि जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.

         यावेळी रायगड जिल्ह्यासह नागोठणे शहर व परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
             

           “स्वागत समारंभास रायगड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपभाई टके, शिवरामभाऊ शिंदे, विभागीय अध्यक्ष संतोष कोळी, शहराध्यक्ष बाळासाहेब टके, कार्याध्यक्ष सचिन कळसकर, पळसचे माजी सरपंच हिराजी शिंदे, प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष शैलेश रावकर, नागोठणेचे माजी उपसरपंच सुरेश जैन, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष प्रमोद जांबेकर, युवा नेते रोशन पारंगे, पप्पूशेठ जैन, महेंद्र हंबीर, किसन बोरकर, रामकृष्ण देवरे, विजय पारंगे, अंकुश ताडकर आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!