नागोठणे ग्रामपंचायतीत भक्तिमय वातावरणात श्री सत्यनारायण महापूजा संपन्न हरिपाठाने वाढवली धार्मिक सोहळ्याची शोभा; मान्यवर व ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती

नागोठणे ग्रामपंचायतीत भक्तिमय वातावरणात श्री सत्यनारायण महापूजा संपन्न
हरिपाठाने वाढवली धार्मिक सोहळ्याची शोभा; मान्यवर व ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती

हायवेनाका नागोठणे (शामकांत नेरपगार) – नागोठणे ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाच्या वतीने सालाबादप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार दि. १२ जून रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. ग्रामपंचायत कर्मचारी संतोष पाटील व सौ. पल्लवी पाटील यांच्या शुभहस्ते मेढा-रोहा येथील प्रसिद्ध पुरोहित हेमंत ओक यांनी विधिवत पूजा-अर्चा करून महापूजा संपन्न केली.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व भाविकांनी श्री सत्यनारायणाचे दर्शन घेऊन पूजा केली तसेच प्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी ४ वाजता महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान संत सेवा मंडळ, नागोठणे यांच्या वतीने हरिपाठाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
महापूजेच्या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया संजय महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंके, माजी सरपंच तथा सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, सदस्य विनीता पाटील, भाविका गिजे, सुप्रिया काकडे, पूनम काळे, अमृता महाडिक, शबाना मुल्ला तसेच ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे उपस्थित होते.
महापूजेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी रविंद्र राऊत, संतोष जोशी, अमोल ताडकर, प्रमोद चोगले, जगदीश चौलकर, रमेश थोरवे, दिलीप तेलंगे, रत्नदीप ताडकर, वैभव चितळकर व इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!