प्रविण काकडे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
नागोठणे ( शामकांत नेरपगार ) –
संस्थापक अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ चे प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नुकताच आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलनच्या वतीने श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने चांदवड नाशिक येथे प्रविण काकडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रविण काकडे हे शैक्षणिक चळवळीला महत्त्व देण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रविण काकडे यांनी आता पर्यंत ५००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, डोंगर दर्या खोऱ्यातील जंगलातील दुर्गम भागातील महिलांना साडी वाटप, सॅनिटरी पॅड वाटप करून मोलाचा वाटा उचलला असून महाराष्ट्रातील काही दुर्गम भागातील विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यातील दुर्गम भागात फार मोठे काम केले आहे. आपली नोकरी सांभाळून प्रविण काकडे समाजसेवेचे कार्य करित आहेत.
प्रविण काकडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात मोठा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करुन महिलांचा यथोचित सन्मान केला असून त्यामध्ये कराडला १४५,पुणे ९०, मुंबई मध्ये १४२ व एकाच वेळी २४५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक चळवळीला महत्त्व देण्यासाठी कराड येथे शिक्षण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरणा प्रसंगी जाहीगरदार तळोदा संस्थान नंदुरबार चे श्रीमंत अमरजीत राजे, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राहुल आहेर, संस्थापक अध्यक्ष आदिवासी धनगर साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले, श्री सदगुरु सहकारी साखर कारखाना चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर, विजयराव हाके, डॉ नरेंद्र बागुल , प्राचार्य मधुकर सलगरे, युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक राहीज, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ चे राज्य उपाध्यक्ष संपतराव शेंडगे, प्रा शितल काकडे, नागु वीरकर, शेखर कुंवर, बन्सीलाल भागवत,प्रा. बाळासाहेब माने,भास्करराव जाधव, प्रा. गणेश हजारे, बापुसाहेब शिंदे, शिवाजीराव ढेपले, संभाजीराव सुळ, सचिन सागोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

