राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; नवीन शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून

राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; नवीन शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून

वाकणनाका(सुनिल कोकळे)- दि. ३० मार्च २०२६

                     महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टी व नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू होण्याबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

                    सदरील प्राप्त परिपत्रकानुसार, राज्य मंडळाच्या सर्व शाळांना शनिवार, २ मे २०२६ पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. काही शाळांमध्ये परीक्षांचे वेळापत्रक किंवा अन्य शैक्षणिक उपक्रम सुरू असल्यास, त्या शाळांना स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

                  तसेच नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ हे सोमवार, दि.१६ जून २०२६ पासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

                  दरम्यान उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेचा विचार करून, १६ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत शाळा सकाळी ७.०० ते ११.१५ या वेळेतच चालविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर ३० जून २०२६ पासून शाळा नियमित वेळापत्रकानुसार सुरू होतील.

                   या आदेशांची अंमलबजावणी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी करावी, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!