नागोठणे भाजप कार्यालयात निलेश थोरे यांची सदिच्छा भेट; कार्यकर्त्यांना संघटन वाढीचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तत्पर” – निलेश थोरे

नागोठणे भाजप कार्यालयात निलेश थोरे यांची सदिच्छा भेट; कार्यकर्त्यांना संघटन वाढीचे मार्गदर्शन
कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तत्पर” – निलेश थोरे

नागोठणे (शामकांत नेरपगार) – भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी मंगळवार दि. 14 एप्रिल रोजी नागोठणे येथील भाजप शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत, त्या सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.


या भेटीदरम्यान तालुका मंडळ अध्यक्ष महेश ठाकुर, भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष निखिल मढवी, तालुका महामंत्री एकनाथ ठाकुर, आनंद लाड, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मोरेश्वर म्हात्रे, विभागीय अध्यक्ष ज्ञानदेव शिर्के, शहराध्यक्ष गणेश घाग, अशोक अहिरे, धनराज उमाळे, विवेक रावकर, तीरथ पोलसानी, सुरेश जैन, मनोहर माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!