नागोठण्यात शनिजयंती उत्सवाची जय्यत तयारी : श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नागोठण्यात शनिजयंती उत्सवाची जय्यत तयारी : श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नागोठणे ( शामकांत नेरपगार ) –

नागोठणे येथे शनिवार दि. १६ मे रोजी वैशाख वद्य ३० अमावस्येनिमित्त शनिजयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात होणाऱ्या या पावन उत्सवात सर्व भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून श्री शनिदेवांचे कृपाआशीर्वाद प्राप्त करावेत, असे आवाहन श्री शनि सेवा समिती, नागोठणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शनिवार दि. १६ मे रोजी संध्याकाळी ७:०० वाजता श्री शनिदेवांची स्थापना करण्यात येणार असून, सायंकाळी ७:३० वाजल्यापासून दर्शन सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून रात्री ९:३० वाजता महाआरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या शनिजयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती आयोजक श्री शनि सेवा समिती, नागोठणे-रायगड यांच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!