नागोठणे रिलायन्स येथे अनंत अंबानींचा ३१ वा वाढदिवस अन्नदान व अभंगवाणीने उत्साहात साजरा

नागोठणे रिलायन्स येथे अनंत अंबानींचा ३१ वा वाढदिवस अन्नदान व अभंगवाणीने उत्साहात साजरा

वाकणनाका (सुनिल कोकळे)

भारताचे नामांकित उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांचा ३१ वा वाढदिवस नागोठणे येथील रिलायन्स समूहाच्या वसाहतीजवळील क्रिकेट मैदानावर भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. यानिमित्त उभारण्यात आलेल्या आकर्षक रंगमंचावर ‘मराठी हास्यजत्रा’ फेम कलाकारांनी उपस्थितांची मनं जिंकली, तसेच संत तुकारामांच्या अभंगवाणीचे गायन करून गायक कलाकारांनी वातावरण भक्तिमय केले.

          (अनंत अंबानी यांना शुभेच्छा देताना चिमुकली) 

या कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान सोहळ्यासाठी नागोठणे परिसरातील सर्व गावकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली. नागरिकांच्या सोयीसाठी मोफत बससेवेचीही व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाला स्थानिक नेते, सरपंच, कार्यकर्ते तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि सुरळीत पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!