ढोल-ताशांच्या गजरात सुमितदादा कातेही थिरकले; नागोठण्यात पालखी सोहळ्याला भक्तीचा साज

Screenshot

ढोल-ताशांच्या गजरात सुमितदादा कातेही थिरकले; नागोठण्यात पालखी सोहळ्याला भक्तीचा साज

वाकणनाका (सुनिल कोकळे) दि.६ एप्रिल – नागोठणे गावाची आराध्यदैवत तथा ग्रामदैवत असलेल्या श्री जोगेश्वरी माता पालखी सोहळा यंदा अत्यंत थाटामाटात, ढोल-ताशांच्या गजरात व डीजेच्या तालावर नाचत-गात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

पालखी सोहळ्यादरम्यान गावातील प्रत्येक आळीत लाडक्या जोगेश्वरी मातेचे आगमन होताच महिलांनी ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी केली, तर तरुण मंडळी नृत्यात रंगून गेल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.

दरम्यान, खडकआळीतील तरुणांनी या सोहळ्याच्या निमित्ताने नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते यांना आमंत्रित केले होते. तरुणांच्या आग्रहाखातर सुमितदादांनी बेंजोच्या तालावर ठेका धरत नृत्यात सहभाग घेतला. त्यांच्या सोबत तरुणांनीही जल्लोषात नाचत सोहळ्याची रंगत वाढवली.

सुमितदादा काते हे यशस्वी उद्योजक आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या या तरुणाला समाजकार्याची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. राजकारणासोबत आपण सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे म्हणून ते आपल्या मतदारसंघातील शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी सक्रिय राहून योगदान देत आहेत.त्यामुळे ते हजारो तरुणांचे आदर्श बनले आहेत.परिणामी त्यांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!