आ. महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन साठलेवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; युवा नेतृत्व मनोहर गोरे यांची मुख्य भूमिका
नागोठणे (शामकांत नेरपगार) दि.५ एप्रिल- रोहा तालुक्यातील विरझोली ग्रामपंचायत हद्दीतील साठलेवाडी गावातील ग्रामस्थांनी एकमुखाने रविवार(दि.५ एप्रिल) रोजी दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. साठलेवाडी ग्रामस्थांनी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेऊन तसेच घोसाळे विभागातील शिवसेनेचे युवा नेते मनोहर गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी स्वागत करून पक्षात आपल्याला मानसन्मानाची वागणूक देऊन आपल्या गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली.
या प्रवेश सोहळ्या प्रसंगी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या सह जिल्हा परिषद सदस्य आप्पा गोंधळी, वावे पोटगे येथील जेष्ठ कार्यकर्ते मोतीराम गिजे,मनोहर पाटील, विरझोलीचे माजी सरपंच शरद बुधर,अशोक बुधर,दिनेश गोरिवले, माजी उपसरपंच प्रकाश गोरीवले, विरझोली ग्रामपंचायत सदस्य मधुकर भुवड,अनिल हरेकरे,विनायक हरेकरे,सामाजिक कार्यकर्ते नारायण पवार, युवा कार्यकर्ते जयंत कोकरे,प्रदीप आग्री यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(साठलेवाडी ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लगेचच युवा नेते मनोहर गोरे यांच्या सोबत नवनिर्वाचित जिल्हापरिषद सदस्या उर्वशी ताई वाडकर व शिवसेना नेते उद्देश वाडकर यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व विकासकामांविषयी चर्चा केली.)
नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत मनोहर गोरे यांचा जरी निसटता पराभव झाला तरी मात्र पराभवाने खचून न जाता त्यांनी पुन्हा एकदा जोमाने दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या सहकार्यातून घोसाळे विभागात विकासाचा झंजावात कायम सुरू ठेवला आहे. सेनेचे युवा नेते मनोहर गोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेश सोहळ्यात साठलेवाडी ग्रामस्थांनी एकमुखाने शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. “गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


