दिड लाखाचा आयफोन परत करून नामदेव वाघमारे यांचा प्रामाणिकपणाचा आदर्श
नागोठणे (शामकांत नेरपगार) – सुकेळी खिंडीत शुक्रवारी (दि. ३) पहाटे २.३० वाजता झालेल्या खासगी बस चा भीषण अपघातानंतर एक हृदयस्पर्शी घटना समोर आली. अपघातस्थळी उपस्थित असताना आधार फाउंडेशनचे संस्थापक, पोलीस मित्र (महाराष्ट्र पोलीस मृत्युंजय दूत) तसेच भाजपा आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे यांना सुमारे दिड लाख रुपये किमतीचा ऍपल आयफोन मोबाईल सापडला.

महागडा मोबाईल स्वतःकडे न ठेवता नामदेव वाघमारे यांनी प्रामाणिकपणा दाखवत तो नागोठणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्याकडे तत्काळ सुपूर्द केला. यावेळी ऐनघर विभागातील सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले व कानसई येथील दिलीप भोईर उपस्थित होते.
नामदेव वाघमारे यांच्या या प्रामाणिक कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या या आदर्श वागणुकीमुळे समाजात सकारात्मक संदेश पसरत आहे.

