नागोठणे ग्रामपंचायतीचा आमदार अनिकेतभाई तटकरे यांचा अभिनंदनाचा ठराव; मासिक सभेत सर्वानुमते मंजूर

नागोठणे ग्रामपंचायतीचा आमदार अनिकेतभाई तटकरे यांचा अभिनंदनाचा ठराव; मासिक सभेत सर्वानुमते मंजूर

 

नागोठणे (शामकांत नेरपगार ): नागोठणे ग्रामपंचायतीच्या जून २०२६ महिन्याच्या मासिक सभेत स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विभागातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल लोकप्रिय आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे अभिनंदन करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
दि. ३० जून २०२६ रोजी ग्रामपंचायतीच्या कै. शैलेन्द्र विजय देशपांडे सभागृहात आयोजित मासिक सभेत हा अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. ठरावाद्वारे नागोठणे ग्रामपंचायतीतर्फे आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या अभिनंदन ठरावाचे सूचक माजी सरपंच विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक होते, तर उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे आणि माजी उपसरपंच अखलाक पानसरे यांनी ठरावास अनुमोदन दिले. उपस्थित सर्व सदस्यांनी ठरावाला एकमताने मंजुरी दिली.
          यावेळी सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, माजी उपसरपंच अखलाक पानसरे, सदस्य संतोष नागोठणेकर, , सुप्रिया काकडे, शबाना मुल्ला, अमृता महाडिक, भाविका गिजे, ज्योती राऊत, पूनम काळे, विनिता पाटील, सुलताना लंबाते, शहनाज अधिकारी, जन्नत कुरेशी तसेच ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!