ऐनघर पंचक्रोशीच्या विकासाला वेग; राजिप सदस्य सुमितदादा काते यांची ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट

ऐनघर पंचक्रोशीच्या विकासाला वेग; राजिप सदस्य सुमितदादा काते यांची ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट

वाकणनाका (सुनिल कोकळे), दि. ८ एप्रिल 

रायगड जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले ऐनघर पंचक्रोशीचे “आन, बान,शान” असलेले कानसई गावचे सुपुत्र व उद्योजक सुमितदादा काते यांनी बुधवार, दि. ८ एप्रिल रोजी ग्रुप ग्रामपंचायत ऐनघर कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी विद्यमान सरपंच सौ. कलावती राजेंद्र कोकळे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी शिवसेना रोहा तालुका उपप्रमुख मनोजदादा खांडेकर, उपसरपंच भगवान शिद, युवा कार्यकर्ते राजेंद्र कोकळे, जगन कोकळे, ग्रामविकास अधिकारी गोविंद शिद तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, सुमितदादा काते यांनी ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचा आढावा घेतला. गावातील वाड्यांवरील रखडलेले रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, अंगणवाड्या व शाळांच्या दुरुस्तीबाबत सखोल चर्चा केली. तसेच जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये गरीब, गरजू, मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थ्यांच्या येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली.

  सदरील निवडणुकीपूर्वी मी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे हे माझे परम कर्तव्य आहे व निवडणुकीत विजयी करून आपण मला आपल्या विभागाचा विकास करण्याची संधी दिलीत हे माझे भाग्यच आहे असे उद्गार काढून सुमितदादा काते यांनी सरपंच सौ कलावती राजेंद्र कोकळे यांना सोबत घेऊन विकासकामांना सुरुवात केल्याने ऐनघर पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!