शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात क्रियाशील शिक्षक सुनिल कोकळे यांना रायगड राजिप सदस्य सुमित काते यांनी दिल्या शुभेच्छा
रोहा (प्रतिनिधी) : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहा येथील मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक तथा पत्रकार सुनिल विठ्ठल कोकळे यांना (६ ऑगस्ट)रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षक सुनिल कोकळे आणि सुमित काते यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. बालपणापासूनची मैत्री आणि परस्परांतील जिव्हाळ्याच्या नात्यामुळे हा भेटीचा क्षण अधिक संस्मरणीय ठरला.

(वाढदिवसाप्रसंगी टिपलेला एक आनंदी क्षण)
याप्रसंगी सुमित काते म्हणाले की, सुनिल कोकळे हे अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून शिक्षक झाले. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना ते विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजविण्यासाठी आणि समाजाला आदर्श पिढी घडविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. अशा कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच आपल्या शिक्षणाचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करावा म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. या पत्रकारितेच्या माध्यमातून दैनिक रायगड टाईम्स या दैनिकात ते रायगड जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यांतील रस्ता,पाणी,शिक्षण,आरोग्य आणि शिक्षण या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

(“ द लायन ऑलवेज किंग ऑफ जंगल” या डायलॉग ला शोभत असे व्यक्तिमत्व असलेल्या सदस्य श्री सुमितदादा काते यांचे स्वागत लायन चे चित्र काढून स्वागत करताना कु.विहान सुनिल कोकळे)
या प्रसंगी प्रकाश मोरे, दिनेश घाग, अमित खामकर, सिंधी, राज दुर्गावले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

