नागोठण्यात ‘ग्रामीण प्रीमियर लीग २०२६’चा जल्लोषात शुभारंभ; क्रिकेटप्रेमींसाठी दोन दिवसांची क्रीडा मेजवानी!
नागोठणे (शामकांत नेरपगार) – नागोठणे जवळील पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील वजरोली येथील कै. मधुशेठ काळे क्रीडांगणावर नागोठणे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘ग्रामीण प्रीमियर लीग २०२६’ क्रिकेट स्पर्धेचा शनिवार (दि.११ एप्रिल) रोजी उत्साहात शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रथमेश काळे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.
या वेळी शेखर ठाकूर, एकनाथ ठाकूर, तुकाराम कदम, प्रकाश कदम, प्रल्हाद राणे, दिनेश इंद्रे, अश्विन तेलंगे, महादेव दळवी, विराज दळवी, अनिरुद्ध जाधव, प्रसाद जांबेकर, अखिल ताडकर, अमोल ताडकर, किशोरभाई म्हात्रे, विलास भिसे, मोतीराम तेलंगे, मनोज वाजे, रत्नमाला लोखंडे, मधुकर गायकर, रविंद्र लोखंडे, नरेश दळवी, संदेश कासार, अनिल कासार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आयोजक समितीचे अध्यक्ष विश्वास गायकर व इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा उद्घाटन सामना ‘विधी इंटरप्रायजेस’ विरुद्ध ‘हर्ष हॉटेल वाघळी’ यांच्यात रंगला. या सामन्यात हर्ष हॉटेल वाघळी संघाने शानदार विजय मिळवला. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत झाले तसेच युवा क्रिकेटपटू योगेश दिघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ग्रामीण प्रीमियर लीगचे हे आठवे पर्व असून यावर्षी तब्बल १६ संघांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेदरम्यान ‘हर्ष हॉटेल बाहेरशिव वाघळी’ यांच्या वतीने दोन दिवस चविष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेचे समालोचन प्रसिद्ध समालोचक रोहन ताडकर व अतिश सारले करत आहेत.
“सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विश्वास गायकर, उपाध्यक्ष विकास ठाकूर, सचिव राकेश शेलार, खजिनदार दिनेश भिसे, सहसचिव राजेश दळवी, सहखजिनदार पवन म्हात्रे तसेच सदस्य आकेश हारपाल, राहुल उंबरे, गणेश राणे, प्रथमेश कदम, महेश किर्दत, राजा नायकोडे, योगेश कासार, सिद्धेश तेलंगे आदींनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस नागोठणे परिसरातील क्रिकेटप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने क्रीडा मेजवानी ठरणार आहे.

