कुहिरेत नागोठणे रिलायन्स फाउंडेशनचा विकास स्पर्श!
प्राथमिक आरोग्य केंद्राचे अत्याधुनिक नूतनीकरण
नागोठणे (शामकांत नेरपगार) –
नागोठणे परिसरातील कुहिरे गावात रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून सीएसआर विभाग अंतर्गत रजिपच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले असून, या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
या नूतनीकरण केलेल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन रिलायन्स कंपनी नागोठणेचे अध्यक्ष शशांक गोयल यांच्या हस्ते मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

यावेळी बोलताना शशांक गोयल यांनी सांगितले की, रिलायन्स कंपनी परिसरातील गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी आमची टीम सातत्याने कार्यरत आहे. परिसरातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. तसेच, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी शिष्यवृत्तीची आवश्यकता असल्यास त्यांनी सीएसआर विभागाच्या अधिकारी वरदा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाला रिलायन्स कंपनी नागोठणेचे अध्यक्ष शशांक गोयल, उपाध्यक्ष गौतम मुकर्जी, नागोठणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, डॉ. प्रशांत बारदोलाई, रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, डॉ. सुनील चौधरी, गडब प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गांगुर्डे, कुहिरे प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीक्षिता मोकल, डॉ. शुभदा कुडतलकर, डॉ. भानू प्रताप, सीएसआर विभागाचे अधिकारी वरदा कुलकर्णी, रॉपस्टन सरेरो, कुहिरे माजी सरपंच युवा सामाजिक कार्यकर्ते उदय जवके, कुहिरे सरपंच प्रज्ञा जवके, वैभव जवके, महेंद्र जवके, ज्ञानेश्वर जवके, गिरीश घोडेकर,प्रज्योत शिंदे, गणू जवके, महादेव शिंदे, केशव शिंदे, मधू वाळंज, ललित शिंदे, तुकाराम शिंदे, पूनम शिंदे, मनस्वी जवके, मयुरी बोन्डेकर, रजनी जवके, अलका जवके, भरती दंत, स्वाती जवके, कुहीरे ग्रामपंचायत अधिकारी विलास बारकुंड यांच्यासह ग्रामस्थ व रिलायन्स कंपनी नागोठणेचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, रिलायन्स कंपनी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने ग्रामस्थांसाठी बॉडी मास कंपोझिशन व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच उदय जवके यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी विलास बारकुंड यांनी केले. कुहिरे गावातील या विकासकामामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, रिलायन्स फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

