इंदरदेव ठाकूरवाडीतील आदिवासी बांधवांना मंगेश कोकळे यांचा मदतीचा हात; महिलांना साड्यांचे वाटप

इंदरदेव ठाकूरवाडीतील आदिवासी बांधवांना मंगेश कोकळे यांचा मदतीचा हात; महिलांना साड्यांचे वाटप

वाकणनाका (प्रतिनिधी) दि. १६ ऑगस्ट – रोहा तालुक्यातील धामणसई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिदुर्गम भागात असलेल्या इंदरदेव ठाकूरवाडीतील गोरगरीब नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत इंदरदेव-भैरवनाथ धनगरवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते आणि लोकप्रिय खासदार तथा लोकनेते मा. सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक मंगेशदादा कोकळे यांनी रविवार (दि.१६ ऑगस्ट) स्वखर्चातून कपड्यांच्या स्वरूपात मदतीचा हात पुढे केला.

            यावेळी मंगेश कोकळे यांच्या वतीने ठाकूरवाडीतील महिलांना नऊवारी व सहावारी साड्या, तर पुरुषांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून आदिवासी बांधवांप्रती असलेले प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

           या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मंगेश कोकळे म्हणाले की, “समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे. त्यामुळे समाजातील गरजू घटकांसाठी आपल्या परीने काहीतरी देणे ही आपली जबाबदारी आहे.” या उदात्त विचाराने प्रेरित होऊन त्यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला.

            या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अनंत कोकळे, संतोष कोकळे, भगवान कोकळे, धाऊ कोकळे, लक्ष्मण शिंगाडे, चंद्रकांत कोकळे, गणपत कोकळे, प्रकाश कोकळे, संदीप कोकळे, हरिचंद्र कोकळे, विलास कोकळे, प्रविण कोकळे, गणेश कोकळे, रमेश शिद, भगवान शिद, किशन शिद, परेश शिद, शांताराम शिद, दत्ता शिद, आंबाजी फसाळे व गोविंद शिद यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

            या सामाजिक उपक्रमाचे ठाकूरवाडीतील नागरिकांनी स्वागत करून तर रमेश शिद यांनी मंगेश कोकळे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!